1/7

मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने नवा स्मार्टफोन Mi MIX 2S लॉन्च केला आहे. शाओमी Mi MIX 2 प्रमाणेच या फोनच्या खालील बाजुला सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन चीनमधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजुला वर्टिकल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेरॅमिक बॉडी असलेला हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलं आहे.
2/7

शाओमीच्या या फोनमध्ये एआय और ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आलं आहे. यासोबतच कंपनीने एक गेमिंग लॅपटॉपही लॉन्च करण्यात आलं आहे. Mi MIX 2S या फोनची किंमत 3,299 युआन (जवळपास 34,055 रुपये) ठेवण्यात आली आहे. चीनच्या बाजारात 3 एप्रिलपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
3/7

4/7

शाओमीचा हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट, 6GB आणि 128 GB मेमरी व्हेरिएंट तसेच 8GB आणि 256 GB मेमरी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोन्सची किंमत क्रमश: 3,299 युआन, 3,599 युआन आणि 3,999 युआनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 1080X2160 पिक्सल रिझॉल्युशनची 5.99 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
5/7

6/7
