Dohaचे सौंदर्य पाहून डोळे दीपवून जातील, नवीन - जुन्या संस्कृतीचा हा अनोखा मेळ
Beauty of Doha : दोहा म्हटले की डोळ्यासमोर वाळवंट उभा राहतो. मात्र, आता तिथे गेल्यावर वेगळाच नजराणा पाहायला मिळतो. या ठिकाणी एकेकाळी सर्वत्र वाळूचा महासागर होता, आज हा भाग गगनचुंबी इमारतींनी फुललेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा पर्यटक येथे जातो तेव्हा त्याला चकाचक इमारती दिसतात. हीच कतारची राजधानी दोहा, असल्याचे लक्षात येतात येथील सौंदर्याच्या प्रेमात तो पडतो.
Surendra Gangan
| May 04, 2023, 11:32 AM IST
.
1/5

Beauty of Doha : तुम्ही जर फिरण्याचा बेत आखात असाल तर आखातामधील कतारला अवश्य भेट दिली पाहिजे. कारण येथील सौंदर्य पाहून तुमचे डोळे दीपवून जातील. आज कतारला भेट देण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येतात. हा देश एकेकाळी अरब देशांच्या निर्बंधांशी झगडत होता, पण आज येथील लोकांचे उत्पन्न जगातील अनेक देशांतील लोकांपेक्षा जास्त आहे आणि हा देश प्रगतीच्या वाटेवर आहे. दोहा हे कतारमधील सर्वात मोठे शहर आहे. कतारचा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत समावेश आहे आणि येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
2/5

3/5

4/5
