PHOTO : मुकेश अंबानी, अदानींपेक्षा श्रीमंत, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरात
भारतातील श्रीमंत उद्योगपती कोण असं म्हटलं तर आपल्या ओठांवर आपसुक मुकेश अंबानी यांचं नाव येतं. पण फोटोमध्ये दिसणारा हा उद्योगपती एकेकाळी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सगळ्यांपेक्षाही श्रीमंत होता. पण त्याचा एका चुकीमुळे 12000 कोटींची मालमत्ता त्याचा हातातून गेली अन् आज त्याला भाड्याचा घरात राहवं लागतंय.
नेहा चौधरी
| Jan 11, 2025, 19:15 PM IST
1/8

वेळ कोणाला कधी काय दाखवलं याचा काही नेम नसतो. आज आपण अशा उद्योगपतीबद्दल जाणून घेणार आहोत, जो एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होता. मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे होती. हा व्यक्ती होता विजयपत सिंघानिया... रेमंड ग्रुपचे एकेकाळचे मालक. त्यांनी मुलगा गौतम सिंघानिया यांच्या नावावर सगळी मालमत्ता केली. त्यानंतर कौटुंबिक कलहमध्ये मुलाने त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला.
2/8

3/8

जेव्हा विजयपत सिंघानिया त्यांच्या कारकिर्दीच्या उंच शिखरावर होते. तेव्हा विजयपत हे गौतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा आणि अनिल अंबानी यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते. त्यांचे काका जीके सिंघानिया यांच्या निधनानंतर त्यांनी रेमंडचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर त्यांनी या कंपनीला फॅशन उद्योगातील जागतिक ब्रँड बनवला.
4/8

5/8

त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने लक्षणीय प्रगती करुन या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपाली आली. विजयपत सिंघानिया हे खूप यशस्वी उद्योगपती होते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. मात्र कुटुंबातील कलहामुळे त्यांच्या आयुष्यात अशांतता आली. त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये व्यवसाय विभागण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा वादळ आलं.
6/8

7/8

8/8
