1/6
tina dabi and amir marriage

आयएएस टॉपर टीना डाबी विवाहबंधनात अडकली आहे. 2015 मध्ये यूपीएससी परिक्षेत जुसऱ्या क्रमांकावर असलेला अतहर आमिर उल शफी खानसोबत टीनाने लग्न केलं आहे. ट्रेनिंग दरम्यान टीना आणि अतहरची ओळख झाली आणि मग ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. या दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक व्हिडिओ शेअर केले असून तीन वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं आहे. टीना दिल्लीची असून अतहर हा कश्मिरचा आहे.
2/6
tina dabi and amir marriage

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कुटुंबियांच्या परवानगीने अनंतनाग येथील पहलगाममधील टूरिस्ट रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा संपन्न पार पडला. टीना आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांसोबत शुक्रवारी कश्मीरमध्ये पोहोचली. काही विधी झाल्यानंतर शनिवारी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर हे दोघेही अतहरच्या पैतृक गावातील देवपोरा मट्टन येथे गेले.
3/6
tina dabi and amir marriage

4/6
tina dabi and amir marriage

5/6
tina dabi and amir marriage

2015 मध्ये यूपीएससी परिक्षेत टीना डाबीने प्रथम क्रमांक पटकावला. तर या परिक्षेत अतहरचा दुसरा क्रमांक आला. दोघांनीबी मसूरीत असलेल्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकडमी फॉर अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये ट्रेनिंग घेतलं. इथेच ते दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. अतहरला पहिल्यांदा टीना आवडली होती. त्याने टीनाला तिथेच प्रपोझ केलं. आणि दोघांन हे नातं सुरू झालं.
6/6
tina dabi and amir marriage
