'या' अभिनेत्यांकडे आहेत सर्वात महागडी घड्याळे, किंमत पाहून बसेल धक्का

बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील कलाकार फक्त आलिशान घर आणि लक्झरी कारसोबतच महागड्या घड्याळांसाठीही ओळखले जातात. ही घड्याळे केवळ वेळ दाखवण्यासाठी नसून यावरुन त्यांची पर्सनॅलिटी देखील दिसून येते. 

Feb 14, 2025, 18:48 PM IST
1/7

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना महागडी घड्याळे घालण्याची आवड आहे. काही घड्याळांची किंमत लाखोंमध्ये आहे, तर काहींची कोटींमध्ये आहे. बॉलिवूड स्टार्स त्यांच्या फॅशन आणि स्टाइलसाठी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. जाणून घ्या काही अशा अभिनेत्याविषयी ज्यांच्याकडे महागड्या कारसोबतच लाखोंच्या घड्याळांचे देखील कलेक्शन आहे.  

2/7

सनी देओल

बॉलीवूडचा दमदार अभिनेता सनी देओलचे देखील या यादीत नाव आहे. त्याच्याकडे Audemars Piguet Royal Oak Offshore Chronograph नावाचे घड्याळ आहे, या घड्याळीची किंमत 1.3 कोटी रुपये आहे.

3/7

राम चरण

साउथचा सुपरस्टार राम चरण याला देखील महागडी घड्याळे घालण्याची खूप आवड आहे. त्याच्याकडे RM 61-01 Yohan Blake नावाचे घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.

4/7

रणवीर सिंह

रणवीर सिंह हा त्याच्या अनोख्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे Rolex Daytona Rainbow नावाचे घड्याळ आहे, याची किंमत 5.59 कोटी रुपये आहे.

5/7

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानकडेही अनेक लक्झरी घड्याळे आहेत. त्याच्या कलेक्शनमध्ये Richard Mille ब्रँडचे एक घड्याळ आहे, याची किंमत 5.75 कोटी रुपये एतकी आहे.  

6/7

सलमान खान

बॉलिवूडचा दबंग सलमान खान देखील त्याच्या महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सलमानच्या कलेक्शनमध्ये Jacob & Co Billionaire Watch आहे, ज्याची किंमत 41 कोटी रुपये आहे. या घड्याळात हिरे जडलेले आहेत, त्यामुळे ते खूपच खास आहे.

7/7

रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर करोडोंचा मालक बनला आहे. त्याच्याकडे तीन महागडी घड्याळे आहेत. ज्यामध्ये Patek Philippe ब्रँडचे एक घड्याळ आहे, ज्याची किंमत तब्बल 6 कोटी रुपये आहे.