Ishan Kishan: इशान नॉट रिचेबल? द्रविड यांच्या सल्ल्यालाही दाखवली केराची टोपली!

सध्या टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर इशान किशनच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु आहे. टीम इंडियामध्ये आगामी सामन्यात किशनला संधी मिळणार का यावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसतंय. 

Surabhi Jagdish | Jan 12, 2024, 11:43 AM IST
1/7

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बाकावर बसवून ठेवल्यानंतर इशानने मेंटल स्ट्रेस सांगून काही दिवसांचा ब्रेक मागितला होता. यावेळी BCCI नेही त्याला मान्यता दिली.  

2/7

यानंतर अफगाणिस्तान सिरीजमध्ये त्याची निवड केली गेली नाही. 

3/7

अशातच इशानवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं होतं, परंतु टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही वायफळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले. 

4/7

कोच द्रविड यांनी ईशानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्या सल्ल्यालाही त्याने गांभीर्याने घेतलेलं नाही. 

5/7

इशान अजूनही देशांतर्गत स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेसाठी झारखंड टीममध्ये परतलेला नाही. 

6/7

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितलं की, इशानने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा त्याच्या उपलब्धतेबाबत काही कळवलेले नाही.  

7/7

जर त्याने याबाबत कळवलं आणि तो आला तर त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण मात्र इशान नॉट रिचेबल आहे.