Cheapest Gold Rate: 'या' देशात मिळतं जगातील सर्वात स्वस्त सोनं; एका तोळ्याचा दर फक्त...

Country With Cheapest Gold In World: जगातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार सोनं कोणत्या देशात मिळतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? येथील सोन्याचे दर आणि भारतातील सोन्याच्या दरांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. जाणून घेऊयात या देशाबद्दल आणि तेथील सोन्याच्या दरांबद्दल...

Swapnil Ghangale | Feb 01, 2025, 14:17 PM IST
1/11

goldrate

जगातील सर्वात स्वस्त सोनं मिळणाऱ्या या देशात 99.99 टक्के शुद्ध सोनं मिळतं. म्हणजेच हे सोनं भारतात आणून विकलं तर भारतातील एक तोळा सोन्याच्या दरापेक्षाही अधिक पैसे मिळतात. हा देश कोणता येथील एक तोळा सोन्याचा दर काय आहे पाहूयात...

2/11

goldrate

भारतात सोन्याचे दर दिवसोंदिवस वाढतानाच दिसत आहेत. सध्या भारतात एक तोळा सोन्यासाठी 84 हजार रुपये मोजावे लागत आहेत.  

3/11

goldrate

भारतातील सोन्याचे दर पाहिल्यावर असा कोणता देश असेल जिथे स्वस्त सोनं मिळत असावं असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल.  

4/11

goldrate

खरोखरच असा एक देश असून तिथे सोनं अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीनुसार मिळतं.  

5/11

goldrate

विशेष म्हणजे या देशात सोन्यावर कोणताही अतिरिक्त कर आकारला जात नाही. त्यामुळेच येथील सोन्याचा दर हा तुलनेनं कमी आहे.  

6/11

goldrate

आपण ज्या देशाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई! दुबईमध्ये जगातील सर्वात स्वस्त आणि तितकच दर्जेदार सोनं मिळतं.  

7/11

goldrate

दुबईमधील सोन्याचे आजच्या दरांबद्दल बोलायचं झालं तर आज दुबईत एक तोळा म्हणजेच 10 ग्राम सोनं 67 हजार 686 रुपये इतकं आहे.  

8/11

goldrate

दुबईतील दियारा हे सोने खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी सोन्याची अनेक दुकाने असून येथे परदेशातूनही लोक सोनं खरेदीसाठी येतात.  

9/11

goldrate

येथील सोन्याच्या दर्जावर सरकारचं आणि यंत्रणांचं विशेष लक्ष असल्याने येथील सोनं हे सर्वात सुद्ध स्वरुपाचं म्हणजे अगदी 99.99 टक्के शुद्ध असतं.  

10/11

goldrate

दुबईमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाइनचे अगदी पारंपारिक रचनांपासून नव्या रचनांपर्यंत अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत.   

11/11

goldrate

दुबईबरोबरच सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांमध्येही भरपूर स्वस्त सोनं मिळतं. हे देशही सोन्याच्या खरेदीसाठी ओळखले जातात कारण तिथे सोन्यावर कर कमी आहे. (सर्व फोटो रॉयटर्सवरुन, प्रातिनिधिक)