1 तास 45 मिनिटांचा सस्पेन्स मिस्ट्री चित्रपट! कथेची सुरुवातीलाच होतात 2 खून; क्लायमॅक्समध्ये उघडी होतात सर्व गुपिते
सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा कथा इतकी रंजक असते की तुम्ही प्रत्येक सीन काळजीपूर्वक बघता आणि तरीही पुढे काय होणार आहे याचा अंदाजही येत नाही.
तेजश्री गायकवाड
| Feb 10, 2025, 16:44 PM IST
सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा कथा इतकी रंजक असते की तुम्ही प्रत्येक सीन काळजीपूर्वक बघता आणि तरीही पुढे काय होणार आहे याचा अंदाजही येत नाही.
1/7

Best Suspense Murder Mystery Movie: विनोदी चित्रपट हसून मनोरंजन करतात, रोमँटिक चित्रपट एखाद्याला प्रेमाची जाणीव करून देतात, भयपट घाबरून सोडतात. तर सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट डोकं चक्रावून टाकतात. अशा चित्रपटांमध्ये प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन घडत असते, त्यामुळे प्रेक्षक क्लायमॅक्सपर्यंत गुंतून राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अप्रतिम चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
2/7

सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा कथा इतकी रंजक असते की तुम्ही प्रत्येक सीन काळजीपूर्वक बघता आणि तरीही पुढे काय होणार आहे याचा अंदाजही येत नाही. जर तुम्हालाही रहस्यमय आणि डोक्याला चक्रावून टाकणारे चित्रपट पाहायला आवडत असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट सस्पेन्स मिस्ट्री चित्रपट घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला तुमच्या जागेवरून हलू देणार नाही. या चित्रपटात एक उत्तम कथा, दमदार अभिनय आणि जबरदस्त ट्विस्ट आहेत, जे तुम्हाला पडद्यावर खिळवून ठेवतील.
3/7

4/7

5/7

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय चोप्रा यांनी केले होते. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्नासारखे कलाकार यामध्ये लीड भूमिकेत दिसले होते. आम्ही 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इत्तेफाक' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, जो 1969 मध्ये आलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि माया सिन्हा (सोनाक्षी सिन्हा) यांच्याभोवती फिरते. विक्रमवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे तर मायावर पतीच्या हत्येचा आरोप आहे.
6/7

या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस अधिकारी देव वर्मा (अक्षय खन्ना) करत आहेत. चित्रपटात अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतात. विकिपीडियानुसार, त्याचे बजेट सुमारे 20 कोटी रुपये आहे आणि बॉक्स ऑफिसवर 56 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसचा समावेश आहे.
7/7
