भारतातील अनोखे शिवमंदिर, इथे होते महादेवाच्या अंगठ्याची पूजा, मंदिराचे रहस्य जाणून घ्या
Achleshwar Mahadev Mandir: माउंट आबूमधील अचलेश्वर महादेव जगातील असे एकमेव मंदिर आहे, जेथे महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. काय आहे या मंदिराचे रहस्य, जाणून घ्या
Mansi kshirsagar
| Aug 06, 2023, 18:22 PM IST
1/5
भारतातील अनोखे शिवमंदिर, इथे होते महादेवाच्या अंगठ्याची पूजा, मंदिराचे रहस्य जाणून घ्या

सध्या अधिक श्रावणमास सुरु आहे तर, येत्या 16 ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणात भगवान महादेवाचे दर्शन घेणे शुभ समजले जाते. तुम्ही आजपर्यंत भगवान महादेवाची अनेक मंदिरांबद्दल ऐकलं असेल किंवा भेटही दिली असेल. मात्र राजस्थानात भगवान महादेवांचे एक अनोखे मंदिर राजस्थानात आहे. राजस्थानात माउंटआबूमध्ये असलेले अचलेश्वर महादेव मंदिर लोकप्रिय आहे.
2/5
स्कंद पुराणात आहे उल्लेख

अनेक मंदिरात भगवान महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते. मात्र, अचलेश्वर महादेव मंदिरात भगवान शिवाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. असं म्हणतात की महादेवाने या पर्वताला आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने आधार दिला आहे. स्कंद पुराणातील अर्बुद खंडातही या मंदिराचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे काय आहे गोष्ट हे जाणून घेऊया.
3/5
पौराणिक कथा

अचलेश्वर मंदिर राजस्थानातील सिरोही जिल्ह्यात ऋषी वशिष्ट यांची तपोभूमी असलेल्या माऊंटआबूच्या अचलगढमध्ये आहे. माऊंटआबूला अर्ध काशी नावानेही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, माऊंटआबूच्या अचलगढमध्ये एक खोल आणि विशाल ब्रह्मदरी होती. या दरीत एकदा ऋषी वशिष्ठाची गाय पडते. यासमस्येमुळं ऋषींनी देवतांकडे जाऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली.
4/5
ब्रह्मादरीचे अंतर

देवतांनी नंदीवर्धन यांना ब्रह्मादरीचे अंतर कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्बुद नावाच्या सापाने त्याच्या पाठीवर बसवत नंदीवर्धनला दरीपर्यंत पोहोचवले. मात्र, त्याचवेळी अर्बुद सापाला अंहकार झाला. संपूर्ण पर्वत मी माझ्या पाठीवर उचलला असूनही मला महत्त्व दिले जात नाहीये, अशी तक्रार केली. तसंच, अर्बुद सापाने हालचाल करण्यास सुरुवात केली त्यामुळं पर्वतावर कंपने होण्यास सुरुवात झाली. तेव्हा घाबरलेल्या सर्व ऋषी मुनींनी महादेवांचा धावा केला.
5/5
उजव्या अंगठ्याने पर्वताला आधार दिला
