पाच वर्ष जुना धमाकेदार Blockbuster, 125 कोटी खर्च करून कमावले 350 कोटींहून अधिक; मिळवले 16 पुरस्कार
Biggest Blockbuster Movie: हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. चित्रपटात दिसलेल्या पात्रांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तेजश्री गायकवाड
| Feb 24, 2025, 15:34 PM IST
Biggest Blockbuster Movie: हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. चित्रपटात दिसलेल्या पात्रांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
1/7

आजकाल एका ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे, ज्यामध्ये एका मराठा योद्ध्याचे शौर्य मोठ्या पडद्यावर बघायला मिळत आहे. हा चित्रपट देशातच नाही तर जगभरात चांगली कमाई करत आहे. चित्रपटात दिसलेल्या पात्रांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधीही मराठा योद्ध्यांच्या शौर्यावर अनेक चित्रपट बनले असून या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
2/7

देशाला अनेक शूरवीर देणाऱ्या, देशासाठी आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या मराठा योद्ध्यांचा इतिहास खूप जुना आहे. अशा अनेक योद्धांवर अनेक चित्रपट आणि टीव्ही शो बनवले गेले आहेत, ज्यांनी चांगल्या कमाईसोबतच उत्तम टीआरपीही मिळवला आहे. आज आम्ही तुम्हाला 5 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने रिलीज होताच केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात बॉक्स ऑफिसला हलवून ठेवले होते. आजही हा सिनेमा खूप लोकांना आवडतो.
3/7

हा चित्रपट 5 वर्षांपूर्वी 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. आम्ही 'तानाजी: द अनसंग वॉरियर' बद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तो मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसला होता. तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर सेनापतींपैकी एक होते, ज्यांनी कोंढाणा किल्ला मुघलांपासून मुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. अजय देवगणने आपल्या दमदार अभिनयाने या पात्राला जीवदान दिले होते.
4/7

या चित्रपटात अजय देवगणची भूमिका खूप आवडली होती आणि आजही त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक केले जाते. त्यांचे हे पात्र आजही लोक विसरलेले नाहीत. चित्रपटाची कथा १७व्या शतकातील मुघल सम्राट औरंगजेबाने कोंढाणा किल्ला जिंकल्याच्या घटनेवर आधारित आहे. शिवाजी महाराजांच्या आदेशावरून तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला परत घेण्याचा संकल्प केला होता. शत्रूचे प्रचंड सैन्य आणि मजबूत तटबंदी असूनही त्यांनी आपल्या रणनीतीने आणि शौर्याने मुघलांचा पराभव केला.
5/7

6/7
