व्हिडिओ : स्विमिंग पूलमधला हा व्हिडिओ झालाय भलताच वायरल!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. एका स्विमिंग पुलाच्या ठिकाणी शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चिला जातोय. 

Updated: Jun 24, 2015, 08:37 AM IST
व्हिडिओ : स्विमिंग पूलमधला हा व्हिडिओ झालाय भलताच वायरल!

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. एका स्विमिंग पुलाच्या ठिकाणी शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चिला जातोय. 

१६ जून रोजी हा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आलाय... आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ ८.२ दशलक्ष वेळा पाहण्यात आलाय. 

स्विमिंग पुलात लहान मुलं फ्लोटरच्या साहाय्य्यानं पोहत असताना अचानक एक फ्लोटर उलटा होतो आणि एक मुलगा पाण्यात बुडू लागतो. पण, त्याच्या आजुबाजूच्या कुणालाच याचा पत्ताही लागलेला नाही.  

पण, ऐनवेळी स्विमिंग पुलाच्या बाजुला उभ्या असलेल्या लाईफगार्डचं लक्ष या मुलाकडे जातं... ती पाण्यात उडी घेते आणि त्या चिमुरड्याला सुखरुप बाहेर घेऊन येतेय, असं या व्हिडिओत दिसतंय. 
 
व्हिडिओ पाहण्यासाठी :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.