नागरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी उद्धव दिल्लीत जाणार

 केंद्राकडे प्रलंबित असणा-य नागरी प्रकल्पांबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. 

Updated: Jul 3, 2014, 09:13 AM IST

मुंबई : केंद्राकडे प्रलंबित असणा-य नागरी प्रकल्पांबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. 

या संदर्भात महापौरांच्या बंगल्यावर मुंबईतले नवनिर्वाचीत खासदार, पालिकेतले वरिष्ठ अधिका-यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. महापालिका अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी पालिका प्रशासनातर्फे नवनिर्वाचीत खासदारांना प्रलंबित प्रकल्पांच्या परवानग्यांबाबत संगणकीय सादरीकरण केलं.

मुंबईतल्या प्रकल्पांबाबत आघाडी सरकारला बायपास करून केंद्राकडून निधी प्राप्त करून घ्यायचा असा तर उद्देश नाही ना अशी चर्चा यामुळे रंगली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.