कसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ

संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.

Updated: Mar 12, 2015, 08:55 PM IST
कसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ
संग्रहीत

मुंबई : संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.

मध्य रेल्वे मार्गावर कसारा लोकल गर्दीने भरली होती. महिल्यांच्या डब्यातही गर्दी होती. लोकल दिवा स्थानकाच्या दरम्यान आल्याने पायात सापाची लुडबूड झाल्याचे झाल्याने महिलांनी पाचावर धारण बसली. एकच पळापळ झाली. साखळी ओढून ट्रेन थांबविण्यात आली. मात्र, साप बाहेर पडून गेल्याची माहिती काही महिलांनी दिली. त्यामुळे साप होता की नाही, हे समजू शकलेले नाही.

दरम्यान, महिलांना निर्भया आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदविली. याला हेल्पलाईन प्रशासनाने दुजोरा दिला. याबाबत पोलिसांनी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.