राज्य मंत्रिमंडळात १५ दिवसात फेरबदल

 मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीसोबत याविषयी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 20, 2017, 03:10 PM IST
राज्य मंत्रिमंडळात १५ दिवसात  फेरबदल

मुंबई : (दीपक भातुसे) राज्य मंत्रिमंडळात पुढील १५ दिवसात फेरबदल होणार आहेत, खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीसोबत याविषयी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

यात विष्णू सावरा, राजकुमार बडोले, बबनराव लोणीकर, राजे अंबरिश आत्राम, विद्या ठाकूर यांच्या बाबतीत फेरबदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रीमंडळातील कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीवर  बदल
 होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.  खांदेपालट करताना जात आणि विभागनिहाय समतोल साधत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.