ठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू

ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं.

Updated: Dec 23, 2016, 05:55 PM IST
ठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू

ठाणे : ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं. त्याच्याखाली ३ ते ४ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेतल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. घटस्थळी ठाणे आपतकालीन व्यवस्थापनाची टीम आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी महापौर संजय मोरे आणि पालिका आयुक्त संजीव जैस्वाल हेदखील दाखल झालेत.