रितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग

हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे.

Updated: Jun 24, 2016, 10:18 PM IST
रितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग

मुंबई : हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. देता का उत्तर या मराठी क्विझ शोचं होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे. रितेश देशमुखनंच ट्विटकरून ही माहिती दिली आहे. 

माझा मराठीमधला पहिला शो होस्ट करण्याची आतूरतेनं वाट पाहत आहे, असं रितेश म्हणाला आहे. हा शो कधी सुरु होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यामध्येच आहे.