प्रियदर्शनी चॅटर्जी झाली मिस इंडिया वर्ल्ड

दिल्लीची प्रियदर्शनी चॅटर्जी यंदाची मिस इंडिया वर्ल्ड पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

Updated: Apr 10, 2016, 07:18 PM IST
प्रियदर्शनी चॅटर्जी झाली मिस इंडिया वर्ल्ड

मुंबई: दिल्लीची प्रियदर्शनी चॅटर्जी यंदाची मिस इंडिया वर्ल्ड पुरस्काराची मानकरी ठरली आहे. बॉलीवूड आणि फॅशन जगतातील सुपर स्टार यांच्या उपस्थितीमध्ये मिस इंडिया वर्ल्डचा पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता शाहरुख खाननं प्रियदर्शनीच्या नावाची घोषणा केली. 

 

या पुरस्कारामुळे प्रियदर्शनी आता मिस वर्ल्ड 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करेल. या पुरस्कारांमध्ये बंगलोरची सुश्रुती कृष्णा आणि लखनऊची पंखुरी गिदवानी दुसरी आणि तिसरी आली. 

या कॉम्पिटिशनमध्ये संजय दत्त, यामी गौतम, अर्जून कपूर, कबीर खान, सानिया मिर्जा, एकता कपूर आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ज्यूरी होते.