अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीला बाय - बाय करणार?

मी चित्रपटसृष्टीत जास्त काळ रमेल असं वाटत नाही... मला वाटलं तर मी पुढच्या वर्षीही या क्षेत्रातून काढता पाय घेईन, असं म्हटलंय सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं...  

Updated: May 15, 2015, 04:12 PM IST
अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीला बाय - बाय करणार?

मुंबई : मी चित्रपटसृष्टीत जास्त काळ रमेल असं वाटत नाही... मला वाटलं तर मी पुढच्या वर्षीही या क्षेत्रातून काढता पाय घेईन, असं म्हटलंय सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं...  

२०१५ वर्ष सुरुवातीपासूनच अनुष्काच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी चांगलं ठरलंय. 'एनएच १०' या सिनेमातल्या तिच्या भूमिकेचं कौतुक सुरूच असतानाच तिचा 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमाही प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

आणि अशा वेळी अनुष्काचं सिनेसृष्टीला बाय बाय करण्याची भाषा तिच्या चाहत्यांसाठी काही धक्क्यापेक्षा कमी नाही.  

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुष्कानं हा खुलासा केलाय. 'मी या क्षेत्रात मला दीर्घकाळ पाहू शकत नाही... पुढच्या वर्षीही मी हे क्षेत्र सोडू शकते. माझ्या कुटुंबाशिवाय मी इतर कोणत्याही गोष्टींत फारशी मनानं अडकलेली नाही. आत्ता मी माझ्या कामाशी खूपच जोडलेली आहे कारण ते सध्या मी एन्जॉय करतेय. जर माझं काम स्फुर्तिदायक असेल तर मी ते करत राहीन. पण, ते फारसं स्फूर्तिदायक नसेल तर मी ते करू शकणार नाही' असं अनुष्कानं म्हटलंय. 

महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बॉम्बे वेलवेट' सिनेमातील अनुष्काच्या अभिनयाची समीक्षकांकडून स्तुती होतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.