दंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई

माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

Updated: Dec 30, 2016, 11:52 AM IST
दंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई

मुंबई : माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

या सिनेमाने अवघ्या आठवड्याभरात तब्बल १९७.५३ कोटींची धाक्कड कमाई केलीये. शुक्रवारी या सिनेमाने २९.७८ कोटी, शनिवारी ३४.८२ कोटी, रविवारी ४२.४१ कोटी, सोमवारी २५.६९ कोटी, मंगळवारी २३.०९ कोटी, बुधवारी २१.४६ कोटी, गुरुवारी २०.२९ कोटींची कमाई केलीये.

आमिर खानसह या सिनेमात मुख्य भूमिका साकारलेल्या फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्रींचे कौतुक केले जातेय. त्यांनीही या सिनेमात जबरदस्त अभिनय केलाय.