दिल्लीची अदिती आर्या बनली 'फेमिना मिस इंडिया २०१५'

शनिवारी पार पडलेल्या 'फेमिना मिस इंडिया 2015'चा मुकुट दिल्लीच्या अदिती आर्याने  आपल्या नावे केला आहे.  हा भव्य सोहळा यशराज स्टुडियोमध्ये पार पडला. 

Updated: Mar 29, 2015, 12:01 PM IST
दिल्लीची अदिती आर्या बनली 'फेमिना मिस इंडिया २०१५'

दिल्ली : शनिवारी पार पडलेल्या 'फेमिना मिस इंडिया 2015'चा मुकुट दिल्लीच्या अदिती आर्याने  आपल्या नावे केला आहे.  हा भव्य सोहळा यशराज स्टुडियोमध्ये पार पडला. 

फेमिना मिस इंडिया 2015 या स्पर्धेत अदितीनंतर दूसरा नंबर लखनऊच्या वर्तिका सिंहने पटकावला आहे. फेमिना मिस इंडिया 2015वर आपलं नाव कोरल्यानंतर अदिती आता मिस वर्ल्ड पीजेंट स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

जॉन अब्राहम, मनीषा कोइराला, सोनू निगम, अनिल कपूर, फिरोज़ नाडियाडवाला, अबू जानी, संदीप खोसला, शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे, शामक डावर आणि चित्रांगदा सिंह हे फेमिना मिस इंडिया 2015 या स्पर्धेचे जज होते.

या कार्यक्रमात करीना कपूर, शाहिद कपूर, जॅकलीन फर्नांडिस, गायिका कनिका कपूर आणि मीत ब्रदर्सने आपले परफॉर्मन्स दिले. तसंच 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कार्यक्रमातील पलक आणि दादीने आपल्या कॉमेडीचा तडका दिला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.