३१ डिसेंबरनिमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

३१ डिसेंबरसाठी पोलीस दलाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Updated: Dec 28, 2017, 07:08 PM IST
३१ डिसेंबरनिमित्त मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

मुंबई : ३१ डिसेंबरसाठी पोलीस दलाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ३० हजार अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ३१ डिसेंबरसाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण मुंबईभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बँडस्टँड, जुहू चौपाटी याठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. तसंच अनेक ठिकाणी वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आलेत. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आलीय.