वरंध घाटात मालवाहतूक ट्रक दरीत कोसळला

महाड-पंढरपूर मार्गावरील वरंध घाटात मालवाहतूक ट्रक जवळपास एक हजार फूट दरीत कोसळलाय. ही गाडी खेड शिवापरची असून एमएच १२ ईएफ ०७०० असा गाडीचा नंबर आहे. 

Updated: Aug 22, 2017, 10:34 PM IST

भोर : महाड-पंढरपूर मार्गावरील वरंध घाटात मालवाहतूक ट्रक जवळपास एक हजार फूट दरीत कोसळलाय. ही गाडी खेड शिवापरची असून एमएच १२ ईएफ ०७०० असा गाडीचा नंबर आहे. 

ही गाडी श्री ट्रान्सपोर्टची आहे मात्र मालक आणि चालक यांची अजूनही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रविवारी हा अपघात झालाय.

सोमवारी संध्याकाळी भोर पोलीस स्टोशनमध्ये एका वाटसरुनं घटनेची माहिती दिली त्यानंतर भोर रेस्क्यू फोर्सेच्या मदतीनं आज सकाळपासून शोध कार्य चालू आहे.