आम्ही मनसेला शिंगावर घ्यायला घाबरत नाही- इम्तियाज जलील

राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.

Updated: Jan 24, 2020, 12:54 PM IST
आम्ही मनसेला शिंगावर घ्यायला घाबरत नाही- इम्तियाज जलील

औरंगाबाद: राज ठाकरे इतके दिवस राजकारणात आहेत. मात्र, आत्ताच त्यांना मशिदीवरील भोंग्याचा त्रास कसा व्हायला लागला, असा सवाल एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या अधिवेशनात आगामी राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली होती. राज यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA)काढण्यात येणाऱ्या मोर्च्यांविषयी संताप व्यक्त केला होता. 

राज ठाकरेंनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये- आंबेडकर

तसेच प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. आमच्या आरतीचा कुणाला त्रास होत नाही. मग तुमच्या मशिदीवरील भोंग्याचा त्रास आम्ही का सहन करायचा?, असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा इम्तियाज जलील यांनी प्रतिवाद केला. ते शुक्रवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहात. आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला. 

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..

राज ठाकरे केवळ राजकारणासाठी हा मुद्दा बाहेर आणत आहेत. शिवसेना सेक्युलर झाल्यामुळे त्यांच्यासाठी राजकीय जमीन तयार झाली आहे. याचा फायदा उठवण्यासाठी मनसे राजकारण करत आहे. मात्र, आम्ही मनसेला घाबरत नाही. 'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यानाच शिंगावर घेतले. आम्ही कुणालाही घाबरत नाही, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.