जळगाव : शासनानं वस्तू तसंच सेवा कर कायदा सक्तीचा केला असताना कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या सराफ बाजारात मात्र सर्रासपणे जीएसटी आणि विना जीएसटीचे व्यवहार सुरु आहेत.

ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ३३ हजारांवर पोहचलाय... तर जळगावच्या सराफ बाजारात मात्र सोन्याला प्रतितोळा ३२ हजार २०० रुपये एवढ्या दराचा फलक लावण्यात आलाय. या तफावतीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. 

जळगावात सराफ बाजार खुलताच आर. सी.  बाफना ज्वेलर्समध्ये सोन्याला प्रतितोळा ३२ हजार २०० रुपये इतका दर सोन्याला जाहीर करण्यात आला. तसा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेही लावण्यात आला होता. 

मुंबईपेक्षा कमी दरात सोने मिळत असल्यानं जळगावात ग्राहकांनी सोने खरेदीचा आनंद लुटला...

दरम्यान, फलकावर लावलेला दर हा विना जीएसटी असल्याचा खुलासा आर. सी. बाफना सुवर्णपेढीच्या संचालकांनी केला. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
gold selling without GST?
News Source: 
Home Title: 

बाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?

बाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
बाजारात सोनं जीएसटीशिवाय विकलं जातंय?
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, November 3, 2018 - 11:31