नवी दिल्ली : हरियाणाच्या हिसारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलायं. प्रेमियुगलांच अजब 'सैराट' प्रकरण इथे पाहायला मिळाल. २३ वर्षांचा मीत गुरमुख सिंह हिसारच्या पीरानवाली गावात राहतो आणि त्याच हिसारमधील विद्युत नगरच्या २२ वर्षांच्या कुसुमशी प्रेमप्रकरण सुरू होतं. ते दोघेही लग्न करू इच्छित होते पण घरातल्यांनी त्यांना विरोध केला. घरातल्यांनी न ऐकल्याचा राग मनात ठेवून दोघांनी एका सायबर कॅफेत किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनापण हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये दोघांवर उपचार सुरू झाले.

हॉस्पीटलमध्ये लग्न 

यानंतर कहाणीला वेगळं वळण आलं. घाबरलेल्या घरातल्या मंडळींना या दोघांची अशी अवस्था पाहून काय कराव हे कळेना. आयसीयूमध्येच दोघांना नवरा नवरीचे कपडे घालण्यात आले आणि दोघांच्या परिवाराने  हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांच्या साक्षीने हे लग्न पारं पडल. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. 

कॉलेजमधलं प्रेम

गुरमुख आणि कुसुम हिसारच्या डिएनए कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. मैत्रीने सुरुवात झाल्यानंतर दोन वर्षांपुर्वी कॉलेज सोडताना एकप्रमेकांशी प्रेम करु लागले होते. दोघांचे परिवार त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. म्हणून कुसुम आणि गुरमुख देवी भवन मंदिराजवळच्या सायबर कॅफेत भेटले आणि तिथेच त्यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर गुरमुखने आपल्या भावाला फोन केला आणि आम्ही आत्महत्या करतोय असं सांगितलं. तात्काळ दोघांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना हॉस्पीटलमध्ये दाखल केलं.

दोघंही बेरोजगार 

हॉस्पीटलमध्ये जेव्हा गुरमुख आणि कुसुमचे नातेवाईक समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. डॉक्टर आणि गार्डने समजावून दोघांनाही शांत केलं. गुरमुख आणि कुसुम दोघेही बेरोजगार आहेत पण तरीही त्यांच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी दिलीयं. कुसुमची तब्येत स्थिर असून गुरमुखच्या तब्येतीत हळूहळू सुधार होताना दिसतोय.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Hariyana young-couple-attempted-suicide for marriage
News Source: 
Home Title: 

घरच्यांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचं विषप्राशन, आयसीयूमध्ये झालं लग्न

घरच्यांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचं विषप्राशन, आयसीयूमध्ये झालं लग्न
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
घरच्यांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाचं विषप्राशन, आयसीयूमध्ये झालं लग्न