सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 25, 2018, 08:09 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर
Representative Image

नवी दिल्ली : तुम्हीही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात वाढ

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ८५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,८३५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

चांदीच्या दरातही वाढ

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ५० रुपयांनी वाढ होत ३९,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध वाढण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकेतील डॉलरच्या मुल्यात घट झाली आहे. तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात १.३७ टक्क्यांची वाढ होत ते १,३४६.८० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीचा भाव १.१३ टक्क्यांनी वाढत १६.५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.