[field_breaking_news_title_url]
मुंबई : सोने - चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असते. गुरूवारी सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली तर शुक्रवारी घसरण झाली. त्यातुलनेने आज सोन्याच्या दरात आणखी घसरण दिसून आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या पूरवठ्याच्या तुलनेत मागणी कमी झाल्याने गेल्या काही दिवसात सोन्याचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय बाजारातील मल्टी कमोडिटी एक्सजेंच MCX मध्ये सोन्याचे दर दुपारी 12 वाजेपर्यंत 46785 प्रति तोळे इतके होते. तर चांदीच दर MCX मध्ये 68423 प्रतिकिलो इतके होते.
मुंबईत आजच्या सोन्याचे दर स्थिर आहेत. कालच्या तुलनेत किंचित घसरण नोंदवली गेली आहे. तर चांदीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सोने 22 कॅरट 44160 प्रतितोळे
सोने 24 कॅरेट 45160 प्रतितोळे
चांदी 67 हजार 500 रुपये प्रति किलो
सोने 22 कॅरेट 44170 प्रतितोळे
सोने 24 कॅरेट 45170 प्रतितोळे
चांदी 67,500 प्रतिकिलो
----------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)