फरीदाबाद : एका काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हरियाणामध्ये प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर बंदुकीतून गोळ्या घालण्यात आल्यात. विकास चौधरी आपल्या कारमध्येच होते. गाडी पार्क करताना त्यांना गाडीतून खालू उतरुही दिले नाही. दोघे जण त्यांच्या कारच्या मागून धावत आलेत. एकाच्या हातात बंदूक होती. त्याने समोरुन थेट फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते दोघे पळून गेलेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

दरम्यान, हरियाणामध्ये गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हरियाणा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर दोघा अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. चौधरी हे सकाळी जिमला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. जिमला पोहोचल्यानंतर ते गाडीतून उतरणार होते इतक्यातच हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. 

हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळी बंदुकीतील गोळ्यांचे १२ बॉक्स सापडलेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
/congress-leader-vikas-chaudhary-was-shot-dead-in-faridabad-haryana
News Source: 
Home Title: 

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, व्हीडिओ झाला व्हायरल

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, व्हीडिओ झाला व्हायरल
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, व्हीडिओ झाला व्हायरल
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, June 28, 2019 - 09:25