'या' रेस्टोरंटमध्ये 'सनी लियोन' आणि 'मिया खलीफा' एकत्र काय करतायेत....

सनी लियोन आणि मिया खलिफा या नावाचा होतोय ट्रेंड  

Updated: Jun 29, 2021, 09:05 PM IST
'या' रेस्टोरंटमध्ये 'सनी लियोन' आणि 'मिया खलीफा' एकत्र काय करतायेत....

मुंबई : आपल्या देशात वस्तू विकायला वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जसंकी, उस ज्यूसच्या स्टॉलवर बॉलिवूड स्टारचे फोटो तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात पैलवानांचे पोस्टर्स तुम्ही 100% पाहिले असतील. मात्र हे असे प्रकार तुम्हाला हॉटेलमध्ये क्वचितच दिसत असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकुन तुम्ही देखील आश्यर्य वाटेल. 

काय आहे फूड मेनू?
जर तुम्हाला खायची आवड असेल तर तुम्ही फूडच्या शोधात बऱ्याच ठिकाणी गेलात असाल आणि सगळ्याच ठिकाणी तुम्हाला नवीन काहीतरी सापडत असेल. मात्र आम्ही तुमच्यासाठी जो पदार्थ आणला आहे तो अद्वितीय आहे कारण त्यांच्या पदार्थांची नाव ऐकताच तुम्ही हादरुन जाल. हे प्रकरण रेस्टॉरंटच्या मेनू यादीशी संबंधित आहे.

कारण या पदार्थात अशी दोन नावं आहेत जी तुम्हाला ठाऊकच असतील, सनी लिओनी आणि मिया खलीफा अशी या पदार्थांची नावं आहेत. दिल्लीतील 'वीर जी मलाई चॅप' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आढळणारे ''सनी लिओन चॅप'' आणि ''मिया खलीफा चॅप'' हे आजकाल लोकांचे आवडते पदार्थ आहेत. याचबरोबर हे पदार्थ सध्या ट्रेंड होतायेत. याशिवाय, रेस्टॉरंटमध्ये "बेबी डॉल डॉप" देखील दिलं जातंय, जी सनी लिओनीच्या रागिनी एमएमएस 2 चित्रपटाच्या बेबी डॉल या गाण्यावरुन प्रेरित आहे.

काय म्हणाले लोकं?
पेटीएम या डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवठादार कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे, यानंतर नेटकरी या ट्विटवर गंमतीदार कमेंट देत आहेत.