VIDEO : प्रभासने खरेदी केली 6 कोटींची ड्रीम कार

प्रभासच्या लक्झरी कारमध्ये आणखी एका कारची वर्णी 

Updated: Mar 30, 2021, 02:36 PM IST
VIDEO : प्रभासने खरेदी केली 6 कोटींची ड्रीम कार

मुंबई : बाहुबली फेम साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) ने आपलं आणखी एक स्वप्न (Dream Car) पूर्ण केलं आहे. प्रभासने लक्झरी कारच्या यादीत ड्रिम कार लेम्बोर्गिनी एवेंटाडोर एस रोडस्टर (Lamborghini Aventadors Roadster) सहभागी होत आहे. प्रभासच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नवीन चमचमाती कार हैदराबादच्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासच्या या कारची किंमत 6 करोड रुपये आहे. 

प्रभास लक्झरी गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्या या कारची एक्स-शोरुमची किंमत 5.79 करोड रुपये आहे. सोशल मीडियावर जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये प्रभासच्या ड्रीम कारमधून कव्हर काढलं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत हीच कार हैदराबादच्या रस्त्यांवर धावत होती. प्रभासने ऑरेंज रंगांची लेम्बोर्गिनी एवेंटाडेर एस रोडस्टर खरेदी केली आहे. महत्वाची म्हणजे प्रभासने ही कार आपले वडिल सूर्या नारायण राजू यांच्या बर्थ एनिव्हर्सरीला खरेदी केली आहे.

प्रभासच्या लक्झरी कारच्या यादीत 1.2 करोड रुपयाची जगुआर एक्सजेसोबत 8 करोडची रोल्स रॉयस फँटम, 50 लाखची बीएमडब्ल्यू एकस-3. 4 करोड रुपयांची रेंज ओव्हर आणि 30 लाख सेडान कार स्कोडा सुपर्बचा देखील समावेश आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रभासला स्पोर्ट्स कार खरेदी करण्याची इच्छा होती. अशात तिने आपल्या ड्रीम लिस्टमध्ये आणखी एका गाडीचा समावेश केला आहे.