समांथासोबतच्या घटस्फोटावर नागा चैतन्यचा धक्कादायक खुलासा

नागा चैतन्यने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Jul 23, 2022, 05:35 PM IST
समांथासोबतच्या घटस्फोटावर नागा चैतन्यचा धक्कादायक खुलासा

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'थँक्यू'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, नागा चैतन्यने पहिल्यांदाच पूर्वाश्रमीची पत्नी समांथा रुथ प्रभूसोबत घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली. 'फॅमिली मॅन 2' अभिनेत्री समांथापासून विभक्त झाल्याविषयी तो म्हणाला की, 'मी पूर्वीच्या तुलनेत खूप बदललो आहे.' या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य-समांथा प्रभूचं नातें चर्चेत आलं आहे. अलीकडेच समांथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu)  'कॉफी विथ करण सीझन 7' (Koffee With Karan) मध्ये देखील दिसली होती, तेव्हा तिने देखील त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

नागा चैतन्यने 'बॉलीवूड लाइफ'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत घटस्फोटाविषयी बोलताना तो म्हणाला, एक माणूस म्हणून मी खूप बदललो आहे. पूर्वी मी इतका मोकळेपणाने बोलू शकत नव्हतो, पण आता हे बदल माझ्यात झाले आहेत. मी एक अशी व्यक्ती आहे जो कुटुंब आणि मित्रांना जोडून राहतो, अशा नवीन व्यक्तीला पाहून मला खूप आनंद झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच समांथानं 'कॉफी विथ करण'च्या 7 व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये जेव्हा करणनं अभिनेत्रीला घटस्फोटाबद्दल विचारलं तेव्हा समांथाने सांगितले की हा टप्पा आमच्या दोघांसाठी खूप कठीण होता, पण मी खूप धाडसी आहे. त्यावेळी त्रास झाला पण आता मी आनंदी आहे.

त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी कशा भावना आहेत या विषयी विचारता समांथा म्हणाली, 'सध्या आमच्या मनात एकमेकांबद्दल तीव्र भावना आहेत. म्हणजे आता जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केलं तर तुम्हाला आमच्यापासून  धारदार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदलेल.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण जोहरने समंथाला विचारलं की, जेव्हा ती नागा चैतन्यपासून वेगळी झाली तेव्हा तिला ट्रोल होण्याची भीती वाटत होती का? प्रत्युत्तरात सामंथा म्हणाली की, तिचं आयुष्य चाहत्यांसमोर उघडं ठेवणं ही तिची निवड होती आणि म्हणून ती याबद्दल तक्रार करू शकत नाही कारण सर्व काही पारदर्शक ठेवण्याचा तिचा निर्णय होता. म्हणूनच नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यावर जे घडलं त्याबद्दल ती तक्रार करू शकत नाही किंवा दुःखी होऊ शकत नाही. कारण तिच्या आयुष्यात लोकांनी आणि चाहत्यांनी खूप गुंतवणूक केली होती.

काही वर्षे डेट केल्यानंतर समांथा रुथ प्रभूने 2017 मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण 2 ऑक्टोबर 2021 रोजी समांथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता.