अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गणपतीचं आगमन

गणपती बाप्पा मोरया...   

Updated: Aug 22, 2020, 09:12 AM IST
अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी गणपतीचं आगमन

मुंबई : आज सर्वांचा लाडका बाप्पांचं आगमन घरा-घरांमध्ये होत आहे. अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी देखील गणपतीचं आगमन झालं. स्वप्निलच्या मुंबई येथील राहत्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दिड दिवसांसाठी स्वप्निलच्या घरी  गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केली जाणार आहे. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वप्निलने त्याच्या कुटुंबासोबत  बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्व विघ्न दूर होतील अशी प्रार्थना देखील गणरायाच्या चरणी केली.

'सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. सर्वच गोष्टी डिजिटल होताना दिसत आहेत. तर येत्या काही दिवसांत सर्व काही सुरळीत होतील. बाप्पांच्या आगमनाने सर्व विघ्न दूर होतील अशी कल्पना करूया.' अशी प्रार्थना स्वप्निलने केली आहे. 

त्याचप्रमाणे अभिनेता सुशांत शेलारच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालं आहे. देशावर कोरोनाचं सावट आहे. या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी दिवस रात्र एक करून ही लढाईच्या जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कोरोना वीरांचे आभार मानन्यासाठी सुशांतने तसे डेकोरेशन केले आहे. 

यंदा देशावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा मोठा उत्सव अगदी साध्या पद्धतीने करताना दिसत आहे. चैतन्याच्या, आनंदाच्या या उत्सवात सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान ठेवून हा सण साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले जात आहे.

गणराजा म्हणजे साक्षात विघ्नहर्ता. या विघ्नहर्त्याच्या आगमनाने देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आसलेलं कोरोनाचं सावट लवकरात-लवकरत दूर होईल अशी प्रार्शना आज प्रत्येक भक्त करत आहे. देशातील नागरिक यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत.