अपघातानंतर मलायकाच्या चेहऱ्यात बदल; फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता

Updated: Apr 16, 2022, 03:50 PM IST
अपघातानंतर मलायकाच्या चेहऱ्यात बदल; फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

मुंबई : मलायका अरोराचा काही दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, मलाइकाच्या या अपघातात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तिचे चाहते नाराज झाले आहेत. आता मलायकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मलायकाने दाखवला तिचा चेहरा
मलायका अरोराने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यासोबतच तिने तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. फोटोत ती आधीसारखीच सुंदर दिसत आहे. मात्र, तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. फोटो पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हिलिंग'. तिचं म्हणणं आहे की, ती बरी होत आहे.  

पोस्ट शेअर करत सांगितली अवस्था 
कार अपघातानंतर काही दिवसांनी मलायका अरोराने एक मोठी पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की, 'गेले काही दिवस आणि माझ्यासोबत घडलेल्या घटना अविश्वसनीय आहेत. जेव्हा मी याबद्दल विचार करते तेव्हा ते चित्रपटातील एखाद्या सीनसारखं वाटतं, जे कधीच घडलं नाही. मी आभारी आहे त्यांची ज्या गार्डियन एंजल कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर माझी खूप काळजी घेतली. ज्यांनी मला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली त्यांचेही आभार. माझं कुटुंब सतत माझ्या पाठीशी उभं होतं.