मुंबई : बॉलिवूडमध्ये नेहमी सेलेब्रिटींच्या नात्याच्या चर्चा कायम रंगत असतात. चाहत्यांना देखील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता कायम असते. सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी गाजवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या ब्रेकअपच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोनला डेट करत होती. इलियाना आणि अँड्र्यूने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असून पेजवरील एकमेकांसोबत असलेले फोटोसुद्धा डिलीट केले आहेत.
काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आले होते. परंतू खुद्द इलियानाने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना रंगताना दिसत आहेत. परंतू यासंबंधी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा दोघांकडून करण्यात आलेली नाही.
बऱ्याच काळापासून इलियाना रूपेरी पडद्यापासून लांब आहे. पण सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे फोटो देखील चांगलेच व्हायरल होत असतात. आता इलियानाच्या नात्यात नक्की काय खटकले आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
इलियाना डिक्रूझ आणि प्रियकर अँड्र्यू नीबोन यांच्या नात्यात दुरावा?