मुंबई : अभिनेत्री करिना कपूर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ती एअरपोर्टवर तर कधी ती रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट होताना दिसते. तिचा प्रत्येक लूक कायमच चर्चेत असतो. नुकताच करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. नुकताच विरल भयानी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ समोर येताच तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री करिना कपूर हातात कॉफी मग घेवून जाताना दिसत आहे. कॅमेराला पाहून ती हात दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोलदेखील केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, प्रेग्नंट है क्या ये. तर अजून एकाने म्हटलंय म्हातारी दिसतेस तू. तर अजून एकाने लिहीलंय, त्याच्या घरात कॉफी प्यायला जागा नाही. बाहेर येत कप घेवून कायम. तर अजून एकाने म्हटलंय, बेबो बुढ्ढी हो गई. तर अजून एकाने लिहीलंय, इतने संस्कारी लुक में केसे वो तो बिना पैंट के घूमती थी. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत युजर्सने तिला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी परिधान केलेला ड्रेस हा थोडा सैल होता. त्यामुळे युजर्सने तिच्या प्रेग्नंसीच्या अटकळ बांधायला सुरुवात केली आहे. याआधीही करिनाच्या प्रेग्ननसीच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र अनेकदा या अफवा असल्यांचं सिद्ध झालंय. प्रेग्नंसीच्या बातमीवर अद्याप तरी करिनाने कोण वक्तव्य केलेलं नाही त्यामुळे ही अभिनेत्री खरंच प्रेग्नंट आहे की, या केवळ अफवा आहेत हे आपल्याला येता काळच सांगू शकतो. सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

करिनाने काही वर्षांपूर्वी सैफसोबत लग्नगाठ बांधली. सैफ आणि करिनाला दोन गोंडस मुलं आहेत. तैमुर असं तिच्या मोठ्या मुलाचं नाव आहे तर जहांगिर असं तिच्या धाकट्या मुलाचं नाव आहे. अनेकदा करिना तिच्या फॅमेलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा तिचा मुलगा तैमुरही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
fackt check Actress Kareena Kapoor pregnant again Baby bump caught on camera
News Source: 
Home Title: 

अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा प्रेग्नंट? बेबी बंप कॅमेरात कैद

अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा प्रेग्नंट? बेबी बंप कॅमेरात कैद
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा प्रेग्नंट? बेबी बंप कॅमेरात कैद
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, August 18, 2023 - 19:58
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
275