नवी दिल्ली :  हृदय विकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरिओग्राफर-डिरेक्टर रेमो डिसोझाला डिस्चार्ज देण्यात आलाय. यानंतर तिच्या पत्नीने अभिनेता सलमान खानचे आभार मानलेयत. कठीण प्रसंगात डिसोजा कुटुंबाला सलमानने भावनिक आधार दिला. इस्टांग्राम पोस्ट लिहून तिने सलमानला थॅंक्स म्हटलंय. 'कठीण काळात भावनिक आधार दिल्याबद्दल सलमान खानचे मनापासून आभार. आमच्यासाठी देवदुतासारखा आहेस. आमच्यासोबत नेहमी राहील्याबद्दल भाई तुझे खूप आभार' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

बॉलिवूडचा प्रख्यात नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. देशभरातून कलाकार आणि त्याचे चाहते सोशल मीडियावर रेमोच्या आरोग्य सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Liz (@lizelleremodsouza)

नुकतीच रेमोवर हृदय शस्त्रक्रिया झाली. पण आता रेमोच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की त्याची प्रकृती आता उत्तम दिसत आहे. अलीकडेच त्याची पत्नी लिजेल डिसूजाने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो म्यूझिकवर पायांची हालचाल करताना दिसत होता.

शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. रेमा डीआयडी शोनंतर त्याने बनवलेल्या अनेक सुपरहिट सिनेमांमधून प्रसिद्धीस आला होता.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Choreographer-director Remo D'Souza's wife Lizelle gratitude towords Salman Khan
News Source: 
Home Title: 

रेमो डिसोझाच्या बायकोची भावनिक पोस्ट, सलमान खानचे मानले आभार

रेमो डिसोझाच्या बायकोची भावनिक पोस्ट, सलमान खानचे मानले आभार
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
रेमो डिसोझाच्या बायकोची भावनिक पोस्ट, सलमान खानचे मानले आभार
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, December 27, 2020 - 15:41
Request Count: 
1