Alia Bhatt ला जवळच्या व्यक्ती शिवाय सासरी करमेना... अखेर तिने उचललं मोठं पाऊल
मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं 14 एप्रिल रोजी लग्न झालं. दोघांचं लग्न सोशल मीडियावरचं नाही, तर चाहत्यांमध्ये देखील चर्चेचा विषय होता. काही दिवसांपूर्वी आलियाने लग्न आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, खास कॅप्शन देखील दिलं आहे. आता आलियाने लग्नामधीलचं काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती रणबीरसोबत नाही, तर तिच्या जीवनातील खास व्यक्तीसोबत दिसत आहे.
आलियाच्या आयुष्यातील खास व्यक्ती म्हणजे तिची पेट Edward. आलियाला Edward सोबत कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. लग्नानंतर आलिया Edward ला देखील सासरी घेऊन गेली आहे.
Edward सोबत आलियाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मांजरीसाठी प्रेम...' असं लिहिलं आहे. तिच्या फोटोवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केलं आहे. लग्नापूर्वी दोघांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगली होती. अत्यंत गुपित ठेवण्यात आलेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताचं चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
Alia Bhatt ला जवळच्या व्यक्ती शिवाय सासरी करमेना... अखेर तिने उचललं मोठं पाऊल
