अभिनेत्री समीरा रेड्डीला 'कन्यारत्न'

समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Updated: Jul 12, 2019, 06:12 PM IST
अभिनेत्री समीरा रेड्डीला 'कन्यारत्न'

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या गरोदरपणातील फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. आता समीरा दुसऱ्यांदा आई झाली आहे. समीराने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. समीराने मुलीची एक झलक शेअर करत सर्वांना गुड न्यूज दिली आहे.

समीराने १२ जुलै रोजी सकाळी मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. समीराने तिच्या गरोदरपणातील संपूर्ण काळ एन्जॉय केला. तिने केलेलं फोटोशूटही ती चाहत्यांसोबत शेअर करत होती. गरोदरपणातही समीरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. आता मुलीच्या जन्मानंतर समीरा इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीराने तिच्या ९व्या महिन्यातील बेबी बंम्पसोबत अंडरवॉटर फोटोशूट केलं होतं. समीराच्या या अंडरवॉटर फोटोशूटने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. याचदरम्यान समीराने नो मेकअप लूक व्हिडिओही शेअर केला होता. 

समीरा आणि तिचा पती अक्षय वर्दे यांना याआधी एक 'हंस' नावाचा मुलगा आहे. समीरा आणि अक्षय २०१४ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.