Jeff Bezos: धडाम! अमेरिकेच्या अवकाशात झाला सर्वात मोठा अपघात, जेफ बेझोस....

New shepard booster engine blast: जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एक म्हणजे जेफ बेझोस. नुकताच बेझोस यांना मोठा धक्का बसलाय. जेफ बेझोस यांची ब्लु ओरिजिन नामक स्पेस कंपनीही आहे. या कंपनीने रॉकेटच्या मदतीने एक मानवरहित कॅप्सूल अंतराळात पाठवायचा प्रयत्न केला. मात्र ऐन मिशनदरम्यान हे रॉकेट फेल झाल्याचं आता समजतंय. रॉकेट फेल झाल्यानंतर या कॅप्सुलने स्वतःला वेगळं केलं. त्यानांतर पॅराशूटच्या माध्यमातून ही कॅप्सूल टेक्सासच्या वाळवंटात सुखरूप पडली आहे. 

टेक्सासमधीलच एका लॉन्च साईटवरून ब्लु ओरिजिन कंपनीच्या शेफर्ड मिशनची 23 वं लॉन्चिंग (NS-23) होतं. या मिशनमध्ये NASA ने देखील गुंतवणूक केली आहे. या कॅप्सुलच्या मदतीने अंतरिक्षात काही प्रयोग केले जाणार होते. या प्रयोगांमधून मायक्रोग्रॅव्हिटीची तपासणी केली जाणार होती. 

जाणून घेऊयात कसं फेल झालं रॉकेट

जेफ बेझोस यांच्या ब्लु ओरिजिन कंपनीच्या न्यू शेफर्ड बूस्टर इंजिनच्या मदतीने कंपनीने एक कॅप्सूल अवकाशात पाठवलेलं. लॉन्चच्या  साधारणतः एका मिनिटानंतर 8 किलोमीटर अवकाशात जाऊन हे रॉकेट फेल झालं. या रॉकेटमधून आगीचे लोळ यायला लागले आणि त्यानांतर हे रॉकेट फेल झालं. रॉकेट फेल होताच यातील ऑटोमेटेड कॅप्सुललने स्वतःला वेगळं करत पॅराशूटच्या मदतीने हे टेक्सासच्या वाळवंटात सुखरूप पडलं

या कॅप्सूलमध्ये अबॉर्ट सिस्टीम लागली आहे. ही सिस्टीम रॅकेटमध्ये गडबड झाल्यास कार्यान्वित होते. ही सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यावर कॅप्सुलला लागलेले बूस्टर या कॅप्सुलला रॉकेटच्या उंचीच्या वर घेऊन जातात. ज्यावेळी हे रॉकेट फेल झालं तेंव्हा कॅप्सुलची उंची 32,739 फूट होती म्हणजेच विमानं ज्या उंचीवरून उडतात साधारणतः तेवढी उंची.  

रॉकेटपासून वेगळं होताना कॅप्सुलचा वेग हा 712 किलोमीटर प्रतितास होता. यानंतर कॅप्सुलचे इंजिन्स बंद झालेत. इंजिन बंद होताच पॅराशूट देखील उघडले गेलेत. फेल झालेलं रॉकेट हझार्ड एरियात कोसळलं तर कॅप्सूल सुरक्षितरित्या टेक्सासच्या वाळवंटात पडलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
new shepard booster engine blast in texas sad news for jeff bezos and their company
News Source: 
Home Title: 

Jeff Bezos: धडाम! अमेरिकेच्या अवकाशात झाला सर्वात मोठा अपघात, जेफ बेझोस....

Jeff Bezos: धडाम! अमेरिकेच्या अवकाशात झाला सर्वात मोठा अपघात, जेफ बेझोस....
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Jeff Bezos: धडाम! अमेरिकेच्या अवकाशात झाला सर्वात मोठा अपघात, जेफ बेझोस....
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, September 14, 2022 - 16:30
Request Count: 
1
Is Breaking News: 
No