video : गेलच्या शतकानंतर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया
मोहाली : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या क्रिस गेलने झंझावाती शतक ठोकले. आयपीएलच्या ११व्या हंगामातील क्रिस गेलचे हे पहिलेच शतक आहे. गेलने अवघ्या ६३ चेंडूत १०३ धावा तडकावल्या. या सामन्यात पंजाबने १५ धावांनी विजय मिळवला. पंजाबच्या विजयापेक्षा या सामन्यात चर्चा रंगली ती गेलच्या शतकाची.
गेलच्या तुफानी शतकी खेळीमुळे पंजाबला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला. याआधी चेन्नईविरुद्धही पंजाबने निसटता विजय मिळवला होता. तिसऱ्या विजयासह पॉईंट टेबलमध्ये पंजाब तिसऱ्या स्थानावर आहे.
Congratulations @henrygayle Just Awesome..#SRHvKXIP @IPL 100 runs in 58 balls pic.twitter.com/EMri9dtzRD
— Mohammad shawon (@shawon841) April 19, 2018
गेलने शतक झळकावताच पंजाबची मालकीण प्रीती झिंटा आनंदाने अक्षरश: नाचू लागली. तर युवराजने आपला आनंद व्यक्त केला.
हंगामातील पहिले शतक
गेलने हैदराबाद विरुद्ध 11 व्या हंगामातील पहिलं शतक ठोकलं. गेलने लीगमधलं सहावं तर टी20 क्रिकेटमधलं 21 वं शतक पूर्ण केलं आहे. लीगमधील अनेक रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे. गेलला सुरुवातीला कोणीच खरेदी केलं नव्हतं. पण शेवटी पंजाबने बेस प्राईस 2 कोटींना गेलला खरेदी केलं. याची खंत देखील गेलने शेवटी बोलून दाखवली.
video : गेलच्या शतकानंतर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया

गेलचे हंगामातील पहिले शतक
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात झळकावले शतक
गेलची १०३ धावांची तुफानी खेळी