रानी-आदित्यच्या आदिराचा पहिला फोटो...

मुंबई : अभिनेत्री रानी मुखर्जी-चोपडा आणि तिचा पती सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या चिमुकल्या आदिरा हिचा पहिला वहिला फोटो सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

आदिराच्या पहिल्या वाढदिवसा निमित्तानं रानीनं एक मनोगत या फोटोसोबत शेअर केलंय. आपल्या मनाचं म्हणणं ऐकण्यासाठी आणि सावधान राहण्यासाठी आपण तिला सतत प्रोत्साहित करू असं यात रानीनं म्हटलंय. 

 

मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अशा क्षणांचा आस्वाद घेतेय, आणि आई बनल्यानंतर एक व्यक्ती म्हणून आणखीन परिपक्व बनण्यासाठी आपल्याला मदत मिळाल्याचं रानीनं म्हटलंय. 

आपलं 'आई'पण सुखावणारं असल्याचं रानी म्हणतेय. मी आणखीनच शांत झालेय... आणखीनच धैर्यवान आणि दयाळू झालेय. हे सगळं अचानक एका दिवसात घडून आलं... असंही यात रानीनं म्हटलंय. 

३८ वर्षीय रानीनं आपल्याला मातृत्वाचं सुख देण्यासाठी ईश्वराचे आभार मानलेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
rani mukherjee shares the first picture of her daughter adira
News Source: 
Home Title: 

रानी-आदित्यच्या आदिराचा पहिला फोटो...

रानी-आदित्यच्या आदिराचा पहिला फोटो...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes