यो यो हनीच्या गाण्यावर थिरकणार बीग बी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि वादग्रस्त यो यो हनी सिंग एकत्र थिरकताना दिसणार आहेत.
तीस वर्षीय संगीतकार, गायक हनी सिंग अमिताभ बच्चन यांच्यासाठी रॅप लिहणार आणि गाणार आहे. `भूतनाथ` या चित्रपटाच्या निमित्तानं हनी सिंग आणि बीग बी प्रथमच एकत्र येणार आहेत. `पार्टी विथ भूतनाथ` हे गाणे हनी सिंग लिहणार आणि गाणार आहे.
शाहरुखच्या `चेन्नई एक्सप्रेस`साठी लुंगी डान्स लिहून हनी सिंगनं रजनीकांतला ट्रीब्युट दिल्याची भावना व्यक्त केली होती. त्याअगोदर `सनी सनी` हे त्याचं गाणंही तरुणाईनं उचलून धरलं होतं. आता, हनीनं खास अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहलेलं रॅपसाँग कसं असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय.
`भूतनाथ रिटर्न` हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. `भूतनाथ रिटर्न` हसवणूक करणारा रहस्यमय चित्रपट होता. भूतनाथ रिटर्नचा सिक्वल असणारा ` भूतनाथ` या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहेत तर `टी सीरीज` आणि `बी आर फिल्मस` या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
यो यो हनीच्या गाण्यावर थिरकणार बीग बी
