कमल हसननं पाहिला रजनीकांतचा ‘कोचाडियान’!

www.24taas.com, वृत्तसंस्था, चेन्नई
अभिनेता-दिग्दर्शक कमल हसननं नवोदित चित्रपट दिग्दर्शक सौंदर्या रजनीकांत अश्विननं आपल्या सुपरस्टार वडिलांचा चित्रपट ‘कोचाडियान’चं स्क्रीनिंग पाहण्याचं निमंत्रण दिलं होतं. स्क्रीनिंगमध्ये सौंदर्यानं कमल हसन यांचं स्वत: स्वागत केलं. रविवारी कमल हसन यांनी सुपरस्टार रजनीकांतचा चित्रपट पाहिला.
कमल हसनच्या मॅनेजरनं ट्विटरवर लिहिलं कमल हसन आता कोचाडियान पाहत आहे. सौंदर्या रजनीनं मान दिलाय. कमल तमिळ चित्रपट ‘उत्तम विलन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र रजनीकांत यांच्या मुलीनं स्वत: आमंत्रण दिल्यानं त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढला.
स्क्रीनिंगला कमल ‘विश्वरुपम’ चित्रपटाची सह-अभिनेत्री पूजा कुमारसोबत पोहोचले. एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार कमल हसन यांनी चित्रपट खूप आवडला. आपल्या पहिल्याच चित्रपटात एवढा साहसी प्रयोग केल्याबद्दल त्यांनी सौंदर्याला शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं. कोचाडियान 23 मेला रिलीज झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Kamal Haasan watched Rajini`s `Kochadaiiyaan`
Home Title: 

कमल हसननं पाहिला रजनीकांतचा ‘कोचाडियान’!

No
170349
No
Authored By: 
Aparna Deshpande