बयाँ ए राखी की राखी बया?
राखी सावंतला कसंही करुन कायम प्रकाशझोतात राहण्याचा फंडा चांगलाच अवगत झाला आहे. राखीने अंगी शून्य कर्तुत्व असताना वादग्रस्त विधानं करुन आपलं करिअर कसं बनवलं ही एक उत्तम केसस्टडी होऊ शकते.
आता पाकिस्तानी स्टारलेट वीणा मलिक टेलिव्हिजन स्वंयवरसाठी सज्ज होत असताना ही संधी राखी सोडेल तर ती राखी कसली? राखीने आपला अफाट तोंडाळपणा कायम असल्याचं सिद्ध करत आपला वीणाच्या निवडीबाबतला निषेध नोंदवला आहे.
अरे इंडियन सेलिब्रिटी को लेना चाहिये था, असं मत राखी सावंतांनी नोंदवलं आहे. भारतीय पालक वीणा मलिकला आपली सून म्हणून स्वीकारतील असं आपल्याला वाटत नसल्याची टिपण्णी राखीने केली आहे. हे तर काहीच नाही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाकिस्तानी स्टारचं लग्न भारतात होऊ देणार नाहीत याचीही खात्री राखीला वाटतं आहे.
राखीला तिच्या लग्नाबद्दल विचारलं असता आपल्या आई वडिलांच्या वैवाहिक जीवनाचा दाखला देत विवाह संस्थेवर आपला विश्वास उरला नसल्याचं तिने सांगितलं. पण चांगला प्रस्ताव आला तर एक दिवस मी नक्कीच लग्नाचा विचार करीन हे इति राखी सावंत.
आता राखीची मुक्ताफळं वारंवार आपण ऐकली असल्यानं यात नवल ते काय असं तुम्ही म्हणालाच, पण असो तुम्हालाही थोडासा विरंगुळा मिळेल म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.
बयाँ ए राखी की राखी बया?
