पूनम म्हणतेय मीच हॉट, गुगलवर आहे टॉप

www.24taas.com

 

प्रसिद्धीच्या झोतात असणारी पूनम पांडे आता भलतीच खूश झाली आहे. आणि आज तिने तिचा आनंद ट्विटरवरून व्यक्तही केला. पूनमने आज ट्विटही केलं आहे की, गुगल सर्चचं असं म्हणणं आहे की, 'इंडिया मलाच शोधत आहे'. म्हणजे जास्तीत जास्त पूनम पांडेलाच शोधत आहेत.

 

गुगल ट्रेंडसच्या हॉट सर्चमध्ये सगळ्यात जास्त सर्च करण्याचा मान हा पूनम पांडेला मिळाला आहे. त्यामुळे पूनम पांडे आज भलतीच खूश आहे. तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.. 'माझ्यावर तुमचं असचं प्रेम असू देत त्यामुळे मी नेहमीच अशी टॉपवर राहीन'.... असं पूनमने म्हटलं आहे.

 

पूनम पांडे ही किंगफिशरची हॉट मॉडेल गेल्या काही दिवसापासून बरीच चर्चेत आहे, गेल्या वर्षी टीम इंडिया वर्ल्डकप जिंकल्यास मी टॉपलेस होईल, असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेली पूनम पांडे..... अजूनही आपली प्रसिद्धी टिकवून आहे. ( आता जरी भारतीय टीमची प्रसिद्धी कमी झाली असली तरी) पूनम पांडे तिच्या बोल्ड अदांमुळे गेले काही दिवस चांगलीच चर्चेत राहिली आहे.

 

त्यामुळे पूनमवर बांग्लादेशी लेखिका तस्लिमा यांनी टीका देखील केली होती. पण त्यामुळे पूनमला थोडाही फरक पडलेला नाही. तिने तिच्या चाहत्यांसाठी आपला अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड केला.

 

 

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Home Title: 

पूनम म्हणतेय मीच हॉट, गुगलवर आहे टॉप

No
58294
No