पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक

Pune Talegaon Drunk And Drive Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात बिल्डरच्या मुलाने पोर्शे कारण दोघांना चिरडलं. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता पुण्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दोन गाड्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल झाला आहे. तळेगावमधील दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. एन. के पाटील असे या मुख्याधिकाराचे नाव आहे. 

दोन गाड्यांना पाठीमागून धडक

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दोन कारला धडक दिली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील हे तळेगाव ते तळेगाव स्टेशन या दरम्यान कार चालवत होते. यावेळी त्यांनी दोन गाड्यांना पाठीमागून धडक दिली. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचे म्हटले जात आहे. 

गुन्हा दाखल

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सिद्धराम इरप्पा लोणीकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मुख्याधिकारी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी मद्यपान करत गाडी चालवल्याची तक्रार लोणीकर यांनी केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात

हा अपघात झाल्यानंतर मुख्याधिकारी पाटील घरी गेले. त्यांना आणण्यासाठी काही पोलीस कर्मचारी गेले. पण पाटील यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पोलिसांचा अधिकचा फौजफाटा घेऊन पाटील यांच्या घरी गेले. त्यानंतर पाटील यांनी दरवाजा उघडला. पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतले आणि ठाण्यात घेऊन आले. मुख्याधिकारी पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची मद्यपान चाचणी करण्यात आली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्यांची चाचणी करण्यात आली.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pune Drunk And Drive Talegaon Municipal council chief officer hit two cars while driving
Home Title: 

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह! नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची दोन गाड्यांना धडक
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, June 2, 2024 - 16:45
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
241