बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...

मुंबई : गेल्या काही वर्षभरात बँक गैरव्यवहारांमुळे संबंधित खातेधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. खातेधारकांना त्यांच्याच खात्यातील रक्कम काढण्यावरुन निर्बंध लावण्यात आले. एखादा खातेधारक बँकेची फसवणूक करतो, पण त्याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. परिणामी बँक एकतर बंद होते किंवा निर्बंध लावण्यात येतात. त्यामुळे काही जण पैसे बँकेत जमा करण्याऐवजी विविध योजनांमध्ये गुंतवतात. मात्र यापुढे बँक बुडीत निघाली तरी हरकत नाही. बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.  या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी ही माहिती दिली. (Account holders will get money if the bank goes bankrupt says Finance Minister Nirmala Sitharaman)

90 दिवसांत पैसे परत...
  
बँक बुडाल्यास ग्राहकांना यापुढं 90 दिवसांत त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. DICGC सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडलं जाणार आहे. त्यानुसार बँक बुडाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 90 दिवसात ग्राहकांना परत मिळेल. त्यामुळे बुडीत बँकांमधील ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Account holders will get money if the bank goes bankrupt says Finance Minister Nirmala Sitharaman
News Source: 
Home Title: 

बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...

बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
बँक बुडाल्यास खातेधारकांना पैसे मिळणार, अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची माहिती...
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, July 28, 2021 - 22:34
Request Count: 
1
Is Breaking News: 
No