फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी दीपिका आपल्या स्टाईलमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

मुंबई : दीपिका पदुकोणला लोकं फॅशन आयकॉन म्हणून ओळखतात. तिच्या कपड्यांची, तिच्या केसांची आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. तसेच स्टाईल आयकॉन म्हणून तिला अनेक मॅग्जीन्सच्या कवरवरती झळकण्याची संधी मिळाली आहे. परंतु असे असुन देखील दीपिका तिच्या फॅशनमुळे ट्रोल झाली आहे. ज्याची सोशल मीडियावरती सर्वत्र चर्चा होत आहेत. 

दीपिकाचा नवरा आणि अभिनेता रणवीर सिंगहा त्याच्या असामान्य फॅशनमुळे अनेकदा ट्रोल झाला आहे, मात्र त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या फॅशनला नेहमीच लोकांनी पसंत केलं. परंतु आता दीपिका तिच्या वेअरेबल फॅशनमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी तिच्या चपलांची आणि स्टाईलची खिल्ली उडवली जात आहे.

सोमवारी ती विमानतळावर दिसली, जिथे तिच्या एअरपोर्ट लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिथे ती ओव्हरसाईज ब्लू प्रिंटेड डेनिम जॅकेट आणि हलक्या निळ्या जीन्समध्ये दिसली. या आउटफिटसोबत दीपिकाने काळी सॅन्डल आणि त्यामध्ये पांढरे मोजे घातले होते.

परंतु लोकांना दीपिकाचा हा लूक फारसा आवडला नाही, ज्यामुळे तिचा फोटो समोर येताच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली.

एका यूजरने लिहिले - 'दीदी तुम्ही रणवीरचे कपडे घातले होते का'. तर दुसऱ्याने लिहिले - 'व्हाइट सॉक्स विथ किटन हील्स'. दीपिकाने काळ्या हिल्ससह पांढरे मोजे घातलेले पाहून लोक आश्चर्यचकित झाले. पुढेही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

एकाने लिहिले- 'रणवीरचा प्रभाव झाला आहे. आता असे दिसते की, डिझायनर देखील तोच आहे.' पुढे आणखी एका युजरने लिहिले - 'त्यांना का वाटते की, हिल्स असलेले मोजे स्टाईलमध्ये आहेत.' एका युजरने दीपिकाच्या फॅशनला आपत्ती म्हटले आहे.

लोकांचे ट्रोल इथेच संपले नाहीत. काहींनी तर अभिनेत्रीला नवीन स्टायलिस्ट घेण्याचा सल्लाही दिला आहे. लिहिले- 'सॉक्स घातलेली ही हिल्स सँडल घाणेरडी दिसत आहेत, तिला नवीन स्टायलिस्टची गरज आहे. नवरा-बायको दोघांनाही स्टायलिस्टची गरज आहे. कृपया ही फॅशन आता फॉलो करू नका, ती अजिबात क्लासी नाही.'

दीपिकाच्या फॅशन चॉईसवर लोकांनी खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु दीपिकाचा एअरपोर्ट लूक बर्‍याचदा कॅज्युअल असतो, जो चाहत्यांना खूप आवडतो.

वर्कफ्रंटवर, दीपिका पदुकोण लवकरच 83 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारली होती. चित्रपटातून तिचा लूक समोर आला आहे, ज्यामध्ये दीपिका हुबेहुब रोमीसारखी दिसत आहे. या ऑन-स्क्रीन लूकमुळे अभिनेत्रीचे खूप कौतुकही होत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
style icon deepika padukone troll because of her shoe style, trollers comare her with her husband Ranveer Singh style and recommend her for change stylish
News Source: 
Home Title: 

फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी दीपिका आपल्या स्टाईलमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी दीपिका आपल्या स्टाईलमुळे ट्रोल, फोटो व्हायरल
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी दीपिका आपल्या स्टाईलमुळे ट्रोल, फोटो व्हायरल
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, December 1, 2021 - 15:00
Request Count: 
1
Is Breaking News: 
No