'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला विचारलं, ट्रान्सजेंडर आहेस का ? मिळालं हे उत्तर

मुंबई : सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेब सिरीज सेक्रेड गेम्स गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये नवाजुद्दीन, सैफ यांच्या अभिनयाचं कौतुक झालंच पण एका अभिनेत्रीने आपल्याकडे लक्ष वेधुन घेतलं. कुब्रा सैत असं या अभिनेत्रीचं नाव आहे. तिने या सिनेमात ट्रान्सजेंडरची भुमिका केलीयं. 'सेक्रेड गेम्स'नंतर वैयक्तिक आणि मुलाखतीत विचारलेल्या, तू ट्रान्सजेंडर आहेस का ? या प्रश्नावर कुब्रादेखील सरळ सरळ खरं उत्तर देऊन टाकते. 

७ वेळा न्यूड सीन शूट

मी ट्रान्सजेंडरची भुमिका तितक्याच इमानदारीने केली जितक्या इमानदारीने मी ६ वर्षाच्या वयात शाळेमध्ये नाटकात 'झाड' झाली होती. अनुराग कश्यपने ऑडिशनमध्येच मला न्यूड सीनबद्दल सांगितलं होतं. हा सीन सुंदर पद्धतीने चित्रीत केला जाईल, जेव्हा सीन शूट होईल तेव्हा तुला कळेल की हे किती महत्त्वाच होतं. जेव्हा तुम्ही खूप चांगल काम करत असता तेव्हा कोणती गोष्ट वाईट होत नाही' असे अनुरागने सांगितल्याचे ती म्हणते. अनुरागने माझ्याकडुन ७ वेळा न्यूड सीन शूट करवून घेतला. प्रत्येकवेळी सीन शूट करताना तो माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा, 'आणखी एकदा तुला हा सीन करावा लागेल' आणि मी तो सीन करायचे.  सीनच्या शुटींग दरम्यान तो म्हणायचा

माझं कौतुकच

'तुम्ही ट्रान्सजेंडर आहात का ?' हे विचारणं मला माझं कौतुक केल्यासारख वाटतं. त्या अभिनयाचा इम्पॅक्ट इतका झाला की अनेकांनी मला ट्रान्सजेंडरच मानलं असे तिने सांगितले.

काय आहे कहाणी ?

या सिरिजमध्ये ८० च्या दशकातील कहाणी सरताज सिंह म्हणजे सैफ अली खानच्या अवतीभोवती फिरते. तो मुंबई पोलिसात कार्यरत असून गुन्हेगार गणेश गायतोंडेशी लढतोय. गणेश स्वत:ला देव समजतो. ही कहाणी विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स नावाच्या बेस्ट सेलिंग नॉवलमधून घेतली असून यामध्ये काही बदल केलेयतं. नवाज यामध्ये अंडरवर्ल्ड डॉनच्या भुमिकेत दिसतोय.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
secred games web series actress kubra sait give answer about transgender question
News Source: 
Home Title: 

'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला विचारलं, ट्रान्सजेंडर आहेस का ? मिळालं हे उत्तर

'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला विचारलं, ट्रान्सजेंडर आहेस का ? मिळालं हे उत्तर
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला विचारलं, ट्रान्सजेंडर आहेस का ? मिळालं हे उत्तर