Drugs Case : धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला एनसीबीने केली अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेकांची  चौकशी करत आहे. दरम्यान ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रोडक्शनचे डायरेक्टर क्षितिज प्रसाद यांना समन्स बजावण्यात आला होता. २५ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या चौकशीनंतर अखेर क्षितिज प्रसाद यांना अटक करण्यात आली आहे. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता. 

सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. आज सकाळी दीपिका पदुकोण एनसीबीच्या कार्यालयात हजर झाली आहे. दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतंच तिच ड्रग्स चॅट समोर आलं आहे. ज्यानंतर दीपिकाला NCB कडून समन पाठवण्यात आला होता. 

तर दीपिकाची आजची चौकशी संपली आहे. आज झालेल्या चौकशीत करिश्मा आणि दीपिका आमने सामने होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीत ते चॅट आपलेच  असल्याची कबुली दीपिकाने दिली आहे. 

सुमारे ५ तास ही चौकशी सुरू होती. दीपिकाची मॅनेजर करिश्माने चॅट संबंधी महत्त्वाचे खुलासे एनसीबी चौकशी दरम्यान केले. त्यामुळे चांगलीचं खळबळ माजली आहे. शिवाय यामुळे दीपिकाच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
drugs case ncb arrested dharma productions kshitij prasad today
News Source: 
Home Title: 

Drugs Case :  धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला एनसीबीने केली अटक

Drugs Case :  धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला एनसीबीने केली अटक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Drugs Case : धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला एनसीबीने केली अटक
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, September 26, 2020 - 15:45
Request Count: 
1